धामणेरमध्ये ऑक्सिजनयुक्त मोफत कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन
Marathi News... सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळणे गरजेचे आहे. यादृष्टीने धामणेरसारखे आदर्शवत व ऑक्सिजनयुक्त मोफत कोरोना केअर सेंटर उभारण्याची प्रेरणा इतरांनी घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कोरेगाव तालुक्यातील धामणेर येथे श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्यामार्पâत तयार करण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह होते. यावेळी कर्नल प्रकाश पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, ए. आर. सुद्रीक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, अविनाश माने, डॉ. शिंदे, डॉ. पाटील आदी उपस्थित होते.
या कोरोना केअर सेंटरमुळे गाव पातळीवरील लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी होणार आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सहकाराच्या माध्यमातून आदर्शवत् असे कोरोना केअर सेंटर गावाने उभे केले आहे. गावामध्ये जे डॉक्टर, नर्सेस आहेत त्यांना घेऊन तात्काळ दाखल होणाNया रुग्णांना हे सेंटर उपलब्ध करावे, अशा सूचना पाटील यांनी केल्या. धामणेर हे राज्यातील आदर्शवत व गौरवलेले गाव आहे. लोकांनी लोकांसाठी केलेला कोरोना सेंटरचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास शेखर सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे रुग्णांची मोफत सोय करण्यासाठी हे दहा बेडचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. या सेंटरमध्ये रुग्णांचे विचार सकारात्मक होण्यासाठी भक्तीसंगीत, दूरचित्रवाणी संच, अशी करमणूक व जनरेटर आदी साधनांची सोय करण्यात आली आहे, असे शहाजी क्षीरसागर यांनी प्रास्तविकात सांगितले. यावेळी श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या