सातारा : कोरोनाच्या रूग्णवाढीने आज पुन्हा विक्रमी संख्या नोंदवली असल्याने सातारा जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. रात्री उशीरा हाती आलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात उच्चांकी ९२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा २० हजार ५३० पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, आज दिवसभरात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या ४२२ नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.
याशिवाय आज सातारा येथील स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १०, कराड उपजिल्हा रुग्णालय ४४, फलटण उपजिल्हा रुग्णालय ९२, कोरेगाव ८२, वाई १५५, खंडाळा १०९, रायगाव ९०, पानमळेवाडी ५८, मायणी ८४, महाबळेश्वर ५०, पाटण १९, दहिवडी ४६, खावली ४९, तळमावले २० व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड येथील २२६ अशा एकूण ११३४ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ५१,७११
- एकूण बाधित - २०,५३०
- घरी सोडण्यात आलेले - ११,४५१
- मृत्यू - ५३६
- उपचारार्थ रुग्ण - ८,५४३
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या