मनमानीला लगाम; एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चित | Latest Marathi News


अवाजवी रक्कम आकारली जात असल्यामुळे सरकारचे पाऊल

Marathi News... सातारा : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाकडून विविध उपचार व तपासण्याचे दरपत्रक निश्चित करण्यात आले आहे. परंतु या तपासण्यांव्यतिरिक्त रुग्णांसाठी सीटीस्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत आहे. या तपासण्यांसाठी खाजगी रुग्णालये किंवा सीटीस्कॅन सुविधा उपलब्ध असलेल्या केंद्राकडून अवाजवी रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने शासनाने एचआरसीटी-चेस्ट तपासणीचे दर निश्चित केले आहेत.

निश्चित करण्यात आलेले कमाल दर

  • १६ स्लाईसपेक्षा कमी स्लाईससाठी २ हजार रुपये
  • १६ ते ६४ स्लाईस क्षमतेच्या तपासणीसाठी २५०० रुपये
  • ६४ स्लाईसच्या पुढील क्षमतेच्या तपासणीसाठी कमाल ३००० रूपये

या तपासण्यांच्या दरामध्ये सीटीस्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सीटी फिल्म, पीपीई किट, डिसइन्फेक्टंट, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी या सर्वांचा समावेश असेल. निश्चित करण्यात आलेले दर हे नियमित व तातडीच्या तपासणीसाठी लागू राहतील. तपासणी केलेल्या अहवालावर किती स्लाईसच्या मशिनवर तपासणी केली हे नमूद करणे तसेच संपूर्ण अहवाल देणे बंधनकारक असेल.

तपासणीचे दर दर्शनी भागावर लावणे बंधनकारक 

सर्व रुग्णालये अथवा तपासणी केंद्रांनी या तपासणीचे दर दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील. तसेच हे दर कोविड तसेच नॉनकोविड रुग्णांसाठी लागू असतील, असे शासन निर्णयात नमूद केले आहे.

एचआरसीटी तपासणीसाठी निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दराने आकारणी केल्यास संबंधितावर कारवाई करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका क्षेत्राबाबत महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या