अटक टाळण्यासाठी वन विभागाचे विलास काळे पत्नीसह गायब | Latest Marathi News


वसुलीसाठी अपहरण प्रकरणी उंब्रज पोलिसांकडून कसून शोध

Marathi News... उंब्रज : पाटणमधील सराफ व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण करून त्यांना गुंडांकरवी रात्रभर अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल झालेले वन विभागाचे पाटणचे अधिकारी विलास काळे व त्यांची पत्नी तसेच अन्य दोघे अद्याप फरारच असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणाकडे पाटण, कराड तालुक्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

पाटणमधील सराफ व्यावसायिक सुहास शेटे यांना दिलेल्या लाखो रूपयांच्या वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून त्यांचे अपहरण करून बेदम मारहाण केल्याच्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली. याप्रकरणी शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वन विभागाचे अधिकारी विलास काळे, त्यांची पत्नी उज्ज्वला काळे व अन्य पाचजणांविरूध्द उंब्रज पोलीस ठाण्यात १७ सप्टेंबरला ३६४ अ, ३२७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. मुळात हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खटपटी झाल्या होत्या. पण अखेरीस गुन्हा दाखल झालाच. 

याप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी मिळाली आहे. परंतु गुन्हा दाखल झाल्यापासून अटक टाळण्यासाठी विलास काळे, त्यांची पत्नी तसेच अभिजित जयवंत मोरे (मूळ रा. कापिल, हल्ली पाचवड फाटा, ता. कराड), दत्तात्रय कोळेकर (रा. मुनावळे) हे फरार आहेत. पोलिसांना गुंगारा देत ते गायब राहिले आहेत. तथापि, पोलीस त्यांच्या मागावर असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

वन विभागातील एकेक भानगडी बाहेर येत असल्याने सध्या या विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. सातारा तालुक्यातील खंडणी प्रकरणात वन विभागाच्या चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे आहे. त्या प्रकरणात खात्याने संबंधित चौघांना सेवेतून निलंबित केले आहे. आता या नव्या प्रकरणाची भर पडली असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या