सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर विविध हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर कृत्रिम प्राणवायू पुरवठा करावा लागत आहे. त्यात कोणताही खंड पडू दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.
सध्या समाज माध्यमातून एका पत्राचा हवाला देऊन सातारा जिल्ह्याला कृत्रिम प्राणवायुचा पुरवठा बंद केला जाईल अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या जात आहेत. (सातारा अपडेट्समधून केवळ आणि केवळ अधिकृत आणि खात्रीशीर बातम्याच दिल्या जात असून विश्वासार्हतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.) ती प्रशासकीय तांत्रिक बाब असून त्यातून प्रशासनाने मार्ग काढला आहे. पूर्वीसारखाच पुरवठा सुरु राहील असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चिंता करू नये. जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वृत्त पसरवू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या