प्रा. ब्रह्मानंद रेळेकर हे मसूरमधील शिवाजी विद्यालयातील इंग्रजीचे निवृत्त शिक्षक प्र. भा. रेळेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव तसेच पत्रकार अभ्युदय रेळेकर यांचे बंधू होत. तल्लख बुध्दिमत्तेच्या जोरावर त्यांनी सतत यश मिळवले. यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्समध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून १९९३ पासून त्यांनी सेवेस प्रारंभ केला. गेल्या २ वर्षांपासून ते या विषयाचे विभागप्रमुख होते. असंख्य विद्यार्थी त्यांच्या हाताखाली घडले. तसेच १२ वर्षांपासून ते १९ महाराष्ट्र बटालियनचे एनसीसी ऑफिसर म्हणून मेजर या रँकवर कार्यरत होते.
गेले काही दिवस ते आजारी होते. आजार तसा गंभीर नव्हता. परंतु सर्वत्र कोरोनाचा कहर असल्याने त्यांना वैद्यकीय सुविधा मिळू शकल्या नाहीत. रूग्णालयात दाखल करायचे तर बेडही मिळत नव्हता. त्यामुळे आजार बळावला. अखेर गुरूवारी सकाळी लवकर एका रूग्णालयात बेड उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली. मसूर येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या