सातारा : जिल्ह्यात दररोज चढत्या क्रमाने कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने परिस्थिती बिघडत चालली आहे. शुक्रवारी रात्रीही जिल्ह्यातील आणखी ८७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हादेखील आजवरचा उच्चांकच आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एवूâण संख्या आता १७ हजार ६६३ पर्यंत जावून पोहोचली आहे. तसेच मृतांचा आकडाही ४६२ वर गेला आहे.
दरम्यान, आज ७५३ नागरिकांना दिला आज डिस्चार्ज दिल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. तसेच स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील १२, कराड उपजिल्हा रुग्णालय १४, फलटण उपजिल्हा रुग्णालय ५४, कोरेगाव १२८, वाई ८०, खंडाळा ११०, रायगांव ७८, पानमळेवाडी १२६, मायणी १९, महाबळेश्वर ४०, दहिवडी ३०, खावली ४५ व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे १८१ अशा एकूण ९१७ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा जिल्हा कोरोना
- घेतलेले एकूण नमुने - ४८,२६४
- एकूण बाधित - १६,७८८
- घरी सोडण्यात आलेले - ९,७७४
- मृत्यू - ४६२
- उपचारार्थ रुग्ण - ६,५५२
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या