जिल्ह्यात आणखी ८१७ जण पॉझिटिव्ह; ७३८ नागरिकांना डिस्चार्ज | Latest Marathi News


सातारा :
सातारा जिल्ह्यात आजही रूग्णवाढीची दहशत कायम आहे. रात्री उशीरा आलेल्या वृत्तानुसार जिल्ह्यात ८१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यातील बाधितांची संख्या २१ हजार ३४७ पर्यंत जावून पोहोचली आहे. त्यामुळे तणाव वाढत असताना जिल्ह्यात ७३८ नागरिकांना आज दिवसभरात घरी सोडण्यात आल्याने जिल्हावासीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या १२ हजार १८९ झाली आहे. 

दरम्यान, स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २५, कराड उपजिल्हा रुग्णालय २१, फलटण उपजिल्हा रुग्णालय ७७, कोरेगाव ५२, वाई १०६, खंडाळा १०२, रायगांव १०७, पानमळेवाडी १५९, मायणी ६१, महाबळेश्वर ४२, दहिवडी ४० व कृष्णा मेडीकल कॉलेज, कराड १६८ अशा एकूण ९६० जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या