खंडणी प्रकरणातील वनकर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला | Latest Marathi News


गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याचा गुन्हा

Marathi News... सातारा : सातारा तालुक्यातील एका तरुणाकडून धमकावून २५ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला परळीचा वनपाल योगेश गावित व वनरक्षक महेश सोनावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून बोरगाव पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी शिवारातील पिकांचे माकडांपासून रक्षण करण्यासाठी ओंकार शिंदे (पिरेवाडी, भैरवगड, ता. सातारा) हा शेतात गेला होता. त्यावेळी वनविभागाच्या वनपाल योगेश गावित, वनसंरक्षक महेश सोनवले, रणजित काकडे व किशोर ढाणे या चारजणांनी त्याला पकडून शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेऊन हाताचे ठसेही घेतले व त्याच्याकडे एक लाख रुपयांची मागणी करत त्याच्या कुटुंबियांकडून पंचवीस हजार रुपये उकळले होते.

५ सप्टेंबरला या घटनेची फिर्याद ओंकार शिंदे याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे चारही वनकर्मचारी पोलिसांना गुंगारा देत आहेत. दरम्यान, गावित व सोनावले यांनी अटकपूर्व जामीनासाठी येथील न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्याय़ाधीश एस. आर. पवार यांच्यापुढे सुनावणी झाली.

गावितवर यापूर्वीही खंडणीचा गुन्हा

राधानगरी अभयारण्यात कामाला असताना २०१५ मध्ये गावित याच्यावर याच पद्धतीचा १ लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने गावितला यापूर्वी सेवेतून निलंबितही करण्यात आले होते, असे सरकार पक्षातर्फे न्याय़ालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच खंडणीची रक्कम देण्यासाठी फिर्यादीने लोकांकडून हातउसने पैसे घेतलेल्या लोकांचे जबाब व कॉलरेकॉर्ड सादर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐवूâन न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. बोरगावचे सहाय्यक निरीक्षक डॉ. सागर वाघ अधिक तपास करत आहेत.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या