स्थानबद्ध झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी शिक्षकांनी केलेल्या कार्याची प्रशंसा
मसूर : सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका कार्यकारिणीने सुरू केलेला 'स्कूल बंद पण शिक्षण सुरू' हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून तो जिल्ह्यासाठी आदर्शवत आहे. कोरोनामुळे घरात स्थानबद्ध झालेल्या विद्यार्थ्यांना हिंदी शिक्षकांनी विविध आव्हाने पेलत जे शिक्षण दिले ती बाब अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी केले.
कराड तालुका हिंदी कार्यकारिणीच्या वतीने इयत्ता आठवी, नववी, दहावीसाठी राबवण्यात आलेल्या हिंदी ऑनलाईन शिक्षण वर्गाच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता. का. सूर्यवंशी होते. यावेळी उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे, कराडच्या गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक, अध्यक्षा संगीता साळुंखे, परीक्षामंत्री शिवाजीराव खामकर, जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज मुजावर, आय. वाय. मुल्ला, कराड तहसील अध्यक्ष फैय्याज संदे, तंत्रस्नेही अध्यापक नवनाथ भोकरे, रवींद्र बागडी, हणमंत सूर्यवंशी, सुषमा माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड तहसील हिंदी कार्यकारिणीने संकटावर मात करत उत्कृष्ट नियोजन व व्याकरणासह संपूर्ण पुस्तकाचे केलेले आदर्शवत अध्यापन कौतुकास्पद आहे, असे उद्गार ता. का. सूर्यवंशी यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना काढले. हिंदी शिक्षकांचा उपक्रम जिल्ह्यासाठी आदर्श असून तो महाराष्ट्रभर व्हावा यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही संगीता साळुंखे यांनी यावेळी दिली. या उपक्रमात एकावेळी पाचशेवर विद्यार्थी सहभागी होतात ही उल्लेखनीय बाब आहे, असे उपशिक्षणाधिकारी जगदाळे म्हणाले.
'जहाँ चाह, वहाँ राह' या उक्तीस अनुसरून कोरोनाच्या भयावह स्थितीतही हिंदी शिक्षकांनी पुढे येऊन पाचशेच्या वर विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन दखलपात्र आहे, अशा शब्दात शबनम मुजावर यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी शहानवाज मुजावर, फैयाज संदे यांनीही मार्गदर्शन केले. पाहुण्यांची ओळख व स्वागत रवींद्र बागडी यांनी केले. कराड तालुका उपाध्यक्ष ह. रा. सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुषमा माने यांनी केले, तर दिलीप माने यांनी आभार मानले. याप्रसंगी कार्यकारिणी सदस्य संजय शिंदे, सुरेखा गोसावी, सुनिता सकटे, उज्ज्वला मोरे, जुबेर बोरगावकर, संभाजी चव्हाण, उत्तम गलांडे, नेताजी पाटील, विजय कुलकर्णी, गणेश शेवाळे, अशोक नागरगोजे उपस्थित होते.
हिंदी शिक्षक हे आमच्यासाठी साक्षात परमेश्वर
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दूरध्वनीवरून हिंदी अध्यापकांच्या या उपक्रमाचे कौतुक करत इतर शिक्षक बांधवानीही अशाच पद्धतीचे अभिनव व नवनवीन उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. केंद्रप्रमुख (कराड) हणमंत काटे यांनीही फोनवरून उपक्रमाचे कौतुक केले. मसूरच्या इंदिरा कन्या प्रशालेची विद्यार्थिनी भक्ती पटेल हिने कोरोना परिस्थितीत हिंदी मार्गदर्शक शिक्षक हे आमच्यासाठी साक्षात परमेश्वर ठरले, या उपक्रमाने आमचा आत्मविश्वास व परीक्षेला सामोरे जाण्यासाठी लागणारी जिद्द निश्चितच वाढली असे सांगून, याबद्दल शिक्षकांचे आभार मानले. तसेच यापुढेही अभ्यासक्रम थांबवू नये, प्रश्नपत्रिका स्वरूप, आदर्श उत्तरपत्रिका सराव व उजळणी घेण्याची विनंती केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या