सातारा येथील ऐतिहासिक ‘फाशीचा वड’ येथे हुतात्म्यांना अभिवादन | News of satara |

news of satara

सातारा :
सातारा शहराजवळील गेंडामाळ परिसरात असलेल्या फाशीचा वड येथील सतरा हुतात्म्यांच्या बलीदानाचा आजचा दिवस. म्हणून त्या हुतात्म्यांना सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

सातारा जिल्ह्याचे भारताच्या इतिहासातील स्थान महत्वपूर्ण आहे. अजिंक्यतारा किल्ला ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची तिसरी राजधानी. छत्रपती संभाजीराजे यांचे पुत्र शाहू यांनी येथून राज्यकारभार पाहिला. स्वातंत्र्याच्या लढाईत सातारच्या प्रतिसरकारची ख्याती देशभर पोहोचली.

 सातारच्या इतिहासातील अजून एक अभिमानाची घटना म्हणजे रंगो बापूजी गुप्ते आणि त्यांचे सहकारी यांनी ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात १८५७ साली केलेले बंड होय. त्यांचा कट उघडकीस आल्यानंतर त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारच्या तीन सदस्यीय न्यायदान मंडळाने या खटल्यात १७ जणांना दोषी ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेची आजच्याच दिवशी, ८ सप्टेंबर १८५७ रोजी गेंडामाळ भागातील फाशीचा वड येथे अंमलबजावणी करण्यात आली. हे ठिकाण फाशीचा वड म्हणून प्रसिध्द आहे. या ठिकाणी हुतात्म्यांना पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी सातारा नगरपालिकेचे अभियंता सुधीर चव्हाण हेही उपस्थित होते. 

दरम्यान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा शाखेच्या वतीने विजय मांडके, प्रा. डॉ. विजय माने,  महेश गुरव, संकेत माने - पाटील, शुभम ढाले, रश्मी लोटेकर, भंडारे यांनी पुष्पांजली अर्पण केली.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या