सातारा : नागठाणे येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह सातारा तालुक्यातील माजगाव हद्दीत उरमोडी नदीच्या पात्रात सापडला. सुशीला विलास पाटोळे (वय ४०) असे या महिलेचे नाव आहे.
सुशीला पाटोळे या आपल्या मुलासह गेल्या पाच वर्षांपासून नागठाणे येथे माहेरी आई-वडिलांकडे वास्तव्यास आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता शौचास जाऊन येते, असे सांगुन त्या घरातून बाहेर पडल्या. बराच वेळ झाले तरी त्या घरी न परतल्यामुळे घरातील लोकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर त्यांचे भाऊ प्रकाश विनायक बोरडे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात हरवल्याबाबतची नोंद दाखल केली होती. गेले दोन दिवस नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. सकाळी माजगावच्या हद्दीत उरमोडी नदीपात्रात त्यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. याबाबतची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. पुढील तपास हवालदार बाजीराव पायमल हे करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive , top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara , all cities of Maharashtra , India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

0 टिप्पण्या