'माझे कुटुंब माझी जबाबदारी' लोकचळवळ करा - मुख्यमंत्री | Latest Marathi News


उध्दव ठाकरे यांनी घेतला सातारा जिल्ह्यातील मोहिमेचा आढावा

Marathi News... सातारा : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम कोरोना संसर्ग रोखण्यात मोठी भूमिका बजावेल. या मोहिमेत जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन ही मोहीम एक लोकचळवळ करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज दृकश्राव्य प्रणालीद्वारे या मोहिमेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.

कोणतीही मोहीम यशस्वी होण्यासाठी त्यामध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. आज आपण जनजागृतीद्वारे कोरोना संकटाचा प्रभावीपणे सामना करु शकतो. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि विशिष्ट अंतर पाळण्यावर भर दिला पाहिजे. यावर्षीचा गणेशोत्सव सर्वांनी शांतपणे साजरा केला. त्याच पध्दतीने आगामी नवरात्र महोत्सवही शांततेत पार पाडा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. या हॉस्पिटलचे काम अंतिम टप्प्यात असून या रुग्णालयाला आणखी निधीची गरज आहे. तो निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केली. ग्रामपंचायत स्तरावर कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्यावर तात्काळ गावातच तात्पुरता उपचार मिळावा यासाठी छोटी छोटी रूग्णालये सुरु करण्यात यावीत, यामुळे रुग्णाची भीती कमी होईल, असेही त्यांनी या आढावा बैठकीत सांगितले.

जिल्ह्यात १६ टक्के तपासणी पूर्ण

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्याच्या १६ टक्के भागाची तपासणी करण्यात आली आहे. यापुढे कोरोना संसर्गाच्या जनजागृतीबाबत निबंध स्पर्धा, निबंध स्पर्धा, फाटोग्राफी आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ६ लाख ८० हजार कुटुंबांना भेटी देणार असून यासाठी ९७४ पथके तयार करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या आढावा बैठकीत सांगितले.


Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या