कोरोना दहशतीमुळे जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांचे १८ सप्टेंबरअखेर काम बंद | Latest Marathi News


सातारा :
कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून सातारा जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांनी १८ सप्टेंबरअखेर कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे निवेदन त्यांच्या वतीने मुद्रांक जिल्हाधिकारी खांडेकर यांना देण्यात आले आहे.

मुद्रांक विक्रेता व दस्त लेखनिक यांचा विविध प्रकारच्या कामासाठी जनतेशी प्रत्यक्ष संपर्क येत असतो. परंतु, सध्या कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. नुकताच कोरोनामुळे पाटण येथील व्यावसायिक बंधू देवकांत यादव यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कराड येथील सहकारी प्रकाश देखमुख यांचेदेखील निधन झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून जिल्ह्यातील सर्वजण मुद्रांक विक्रेते व दस्तऐेवज लेखनिक कामे सामाजिक बांधिलकी म्हणून दि. १० ते १८ सप्टेंबरपर्यंत कामकाज बंद ठेवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

जनता व सरकार यामधील महत्वाचा दुवा असलेले मुद्रांक विक्रेते व लेखनिक यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासन दरबारी जमा होतो. त्या अनुषंगाने मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिक यांनाही कोविड सुरक्षा विमा कवच व अन्य सुविधा शासनाकडून मिळाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या