जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी आता ई - लर्निंग ऑफलाईन अ‍ॅप Latest Marathi News


संकटकाळात मसूर ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

मसूर : कोरोनाच्या संकटकाळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील विद्याथ्र्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मसूर ग्रामपंचायतीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेची मसूर येथील मुलांची शाळा, मुलींची शाळा तसेच संजयनगर येथील शाळेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ई - लर्निंग या ऑफलाईन अ‍ॅपची सोय करण्यात आली आहे. विध्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून पालकांनी हे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घ्यावे व मुलांचा शैक्षणिक विकास साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले हे अ‍ॅप शाळांना वितरण करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, ग्रामविकास अधिकारी विकास स्वामी, राहूल तारळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मसूर येथील पहिली ते सातवीच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून सुमारे ३५० विध्याथ्र्यांना लाभ घेता येईल असे सहजसोपे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. आज कोरोनामुळे सर्वच शाळा बंद आहेत. मात्र अभ्यासक्रम ऑनलाईन सुरु आहे. परंतु पालकांच्या आर्थिकतेचा विचार केला तर ते न परवडणारे आहे. म्हणून आम्ही हे ऑफलाईन सॉफ्टवेअर खरेदी केले आहे. इंटरनेटशिवाय मुलांना याचा लाभ घेता येणार आहे. अभ्यासक्रमातील प्रस्तावना, सराव, अभ्यास, परीक्षा, खेळ अशाप्रकारची विध्याथ्र्यांना उपयुक्त अशी सहजसोपी व मनोरंजनात्मक मांडणी ही या अ‍ॅपची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे मुलांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सरपंच पंकज दीक्षित यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमास मसूर मुले, मसूर मुली व संजयनगर शाळेतील शिक्षक, शिक्षिका, राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलचे सिकंदर शेख, सामाजिक कार्यकर्ते कासम पटेल, सचिन दीक्षित यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.


Get  all live and latest Marathi news, Maharashtra news and  all  exclusive , top marathi news headlines from  politics, sports, ententertainment,  business, all events from satara ,  all cities of Maharashtra , India.


आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या