सहकारी संस्थांच्या निवडणुका आणखी ३ महिने लांबणीवर | Latest Marathi News


कोरोनामुळे ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

Marathi News... मुंबई : कोरोनाचे संकट अद्याप कायम असल्यामुळे राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सहकार विभागाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२० पर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात जवळपास मार्चपासून कोरोनाचे संकट सुरू झाले असून क्रमाक्रमाने ते गंभीर होत गेले आहे. यादरम्यान, ज्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे, त्यांची पंचवार्षिक निवडणूक घेणे क्रमप्रापत्त होते. परंतु कोरोना संसर्ग टाळण्यासाठी या सर्व संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका यापूर्वी दोनवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. प्रथम १८ मार्च रोजी आणि नंतर १७ जून रोजी यासंबंधीचे आदेश राज्य सरकारने जारी केले होते.

गेल्या सहा महिन्यात राज्यातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात न आल्याने राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचा निर्णयही सरकारने घेतला. मात्र राज्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. 

तथापि, निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात घेण्याच्या दृष्टीकोनातून उच्च व सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या