Satara News : सहकारमंत्र्यांच्या दालनात 'कोरोना किलर'


सहकारी आस्थापनांमध्ये यंत्रणा बसविण्याबाबत लवकरच निर्णय

Satara News : जागतिक पातळीवर विशेष महत्व प्राप्त झालेल्या आयोनायझेशन या शास्त्रशुद्ध  पद्धतीवर संशोधित 'कोरोना किलर' हे मशिन देशभर मान्यताप्राप्त होत असताना आता महाराष्ट्राचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या  दालनातही हे मशिन बसविण्यात आले आहे.

या मशिनचे संशोधन  केलेल्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स् या कंपनीचे संस्थापक, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर भाऊसाहेब जंजिरे व  सहकाऱ्यांनी बाळासाहेब पाटील  यांच्या मंत्रालयातील दालनात कोरोना किलर या मशिनचे सादरीकरण केले. 

कोरोना व्हायरसला ही मशिन कशा पद्धतीने निष्प्रभ करते याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यानंतर हे मशिन बसविण्यात आले.

'सहकारी संस्था आणि आस्थापनांमध्ये हे उपकरण बसविण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल', असे सहकार मंत्र्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी लिमका पारितोषिक विजेते विकास पाटील - शिरगांवकर, अश्विन शहा, विनायक पटवर्धन हे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशिन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे.

विविध ठिकाणी संशोधनाचे सादरीकरण

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशिन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशिन यापूर्वीच या संस्थेने बसविले आहे. 

उपमुख्य मंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या उपकरणाचे मुंबई येथे लोकार्पण करण्यात आले, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या