Satara News : 'या' मशिनमध्ये आहे व्हायरसमुक्त करण्याची क्षमता ?

 


अपायकारक सूक्ष्मजीव निष्प्रभ होत असल्याचा दावा

Satara News : कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो. परंतु असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. 
नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले 'कोरोना किलर' हे मशिन संशोधित केल्याचे इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगितले.

विविध विभागांकडून कार्यक्षमता प्रमाणित

आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च), एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने या मशिनची कार्यक्षमता प्रमाणित केली आहे. 

निवासस्थानापासून ते सर्व व्यवसायाच्या ठिकाणी हे मशिन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशिन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशिन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण हवेत सोडते. 

ज्या ज्या ठिकाणी ही हवा पोहोचते तेथे हे आयन पोहचतात व कोरोना व्हायरस आणि इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगितले.

विजेवर चालणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण

'कोरोना किलर' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते. 

घर, हॉस्पिटल, शाळा, गाड्या, विमान, प्रयोगशाळा, क्वारंटाईन सेंटर, कारखाने, मंदिरे अशा कोणत्याही ठिकाणी ते वापरता येते. रुग्णाचे मास्क, हातमोजे, बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते, असे त्यांनी म्हटले आहे.

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या