अध्यक्ष, संचालकांसह ६५ जणांविरूध्द शिराळा पोलिसात गुन्हा दाखल
विपूल शहा / शिराळा : सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेत ३०.७८ कोटी रुपयांच्या कथित घोटाळाप्रकरणी विद्यमान अध्यक्षांसह संचालक, अधिकारी, कर्मचारी अशा ६५ जणांविरुद्ध शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात अनिल सच्चिदानंद पैलवान (वय ५१ वर्षे, धंदा नोकरी, विशेष लेखा परिक्षक, रा. सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. २ एप्रिल २०११ ते २९ पेâब्रुवारी २०२० च्या दरम्यान स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपहार केला आहे. यामध्ये सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँकेत व त्याअंतर्गत शाखांमध्ये ठेवीच्या व सभासद भागभांडवलाच्या रक्कमेतील रोख शिल्लक रक्कमेतून १ कोटी ३ लाख ८१ हजार ६०४ रूपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या महावीरनगर, सांगली शाखेतून ८ लाख रुपये बेकायदेशीरपणे आरटीजीएस करुन अपहार, विनातारणकी जामीनकी व शेती कर्जातून २८ कोटी ६७ हजार ३९ हजार १८६ रूपये, बँकेच्या मलकापूर शाखेतून वाहन तारण कर्जातून १२ लाख २८ हजार ५०० रूपये तसेच स्थावर मालमत्तेच्या प्रत्यक्ष असलेल्या मूल्यांकनापेक्षा जादा मूल्यांकन वाढवून १ कोटी ९८ लाख ६० हजार ६२४ रूपये असा एवूâण ३० कोटी ७८ लाख २८ हजार ३१० रुपये इतक्या रक्कमेचा अपहार केला आहे.
या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल
विद्यमान अध्यक्ष संजय हंबीरराव नाईक, संचालक हंबीरराव सर्जेराव नाईक (मयत), दिनकर दौलू पाटील, सुधाकर व्यंकटेश हसबनीस, उदयसिंग सर्जेराव नाईक, भगतसिंग वसंतराव नाईक, संपतराव निवृत्ती पाटील, शामराव धोंडिबा सावंत, पांडुरंग शंकर शिंदे, रघुनाथ तुकाराम बंडगर, हमजा इमाम सुतार, प्रकाश रावजी धस, विमलाताई शिवाजीराव चव्हाण, श्रीमती उज्वला बाबूराव पाटील, शिवाजी आण्णा रावते, दिनकर नरसू घाडगे, ज्ञानदेव निवृत्ती मिरजकर, अरविंद आबासो पवार, दिलीपराव महादेवराव सोनटक्के हे १९ संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंह बाबासाहेब घोरपडे, दिलीप शामराव पाटील, पांडुरंग नामदेव कुंभार यांच्यासह शाखाधिकारी, रोखपाल, पासिंग अधिकारी, कर्जदार, मूल्यांकनकार व अन्य अज्ञात त्रयस्थ असे ४६ अशा एकूण ६५ जणांविरूध्द ४०६, ४०८, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४६९, ४७१, सह ३४ कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील करीत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या