इको फ्रेंडली पध्दतीने विकास व्हावा; मंत्रालयात झाली प्राथमिक बैठक
Chandoli Turism News : इको प्रेंâडली पध्दतीने चांदोली धरण परिसराचा पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण प्राथमिक बैठक झाली, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
चांदोली हे सांगली जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण आहे. ३४ टीएमसी पाणीसाठा असलेला प्रचंड जलाशय, चांदोली राष्ट्रीय उद्यान व व्याघ्र प्रकल्प, वीज निर्मिती प्रकल्प, वारणा नदी, काही अंतरावर असलेले गुढे - पाचगणी थंड हवेचे पठार, स्वातंत्र्य संग्रामातील ऐतिहासिक वारसा असलेला परिसर व अनेक गावे असा वारसा या परिसराला लाभला आहे.
पर्यटन विकास झाल्यास या परिसराचा कायापालट होणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. व्यवसाय वाढतील. बेरोजगार व अल्पभूधारक असलेला येथील शेतकरी उपजीविकेसाठी मुंबईचा रस्ता धरतो, त्याच्या हाताला काम, व्यवसाय अथवा नोकरी मिळेल.
एकूणच या डोंगराळ भागातील सर्वसामान्यांचे राहणीमान उंचावेल. शिवाय शासनाचा महसूल वाढेल. त्यादृष्टीने विचार होऊन येथील पर्यटन विकासाला चालना द्यावी, अशी भूमिका आपण या बैठकीत मांडल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
सर्वेक्षण करून अहवाल सादर करा !
त्यावर मंत्री जयंत पाटील व उपस्थित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सविस्तर चर्चा करून विविध मते मांडली. काही अधिकारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभागी होते.
एकूणच याबाबत कोणकोणत्या पध्दतीने पर्यटन विकास साधला जाऊ शकतो, याची चाचपणी करण्यासाठी खाजगी सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असे मंत्री पाटील यांनी सूचित केले. पर्यटन विकास हा पूर्णपणे इको फ्रेंडली तत्वाचा अवलंब करून साधला जावा, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
बैठकीस जलसंपदाचे सचिव घाणेकर, उपसचिव व्ही. एम. चिल्ले, पर्यटन विभागाचे संचालक दिलीप गावडे, सहसंचालक धनंजय सावळकर, कृष्णा खोरे महामंडळाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले, पाटबंधारे कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे आदी अधिकारी मंडळी प्रत्यक्ष व व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत जोडली होती.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या