देशभरात संतप्त प्रतिक्रिया; दडपशाहीच्या विरोधात सर्वत्र निदर्शने
Marathi News... नवी दिल्ली : हाथरस कांडानंतर पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यानंतरही त्यांनी हाथरसला जाण्याचा आपला निर्धार कायम ठेवल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. या घटनेबद्दल देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हाथरस जिल्ह्यात दलित मुलीवर सामुहिक बलात्कार करून तिची जीभ कापण्यापर्यंतचे क्रौर्य घडल्याने उत्तर प्रदेशात प्रक्षोभ उसळला असून त्याचे पडसाद देशभर उमटत आहेत. त्यातच पीडित मुलीच्या कुटुंबाला घरात डांबून ठेवून पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री परस्पर अंत्यसंस्कार केल्याने संतप्त लोक रस्त्यावर उतरले होते. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला.
या प्रकरणातील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज हाथरसला निघाले होते. त्यावेळी ग्रेटर नोएडाजवळ पोलिसांनी त्यांची वाहने अडवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही राहुल गांधी यांनी हाथरसला पायी जाण्याचा पवित्रा घेतला. पण यमुना एक्सप्रेस वेवर पोलिसांनी त्यांना पुन्हा अटकाव केला. त्यावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांच्या कॉलरला हात घातला. त्यांना ढकलून दिले. त्यामुळे राहुल गांधी खाली पडले. या दडपशाहीच्या विरोधात त्यांनी त्याच ठिकाणी धरणे धरले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
पोलिसांनी धक्का मारला, लाठ्या चालवल्या
आपल्याला पीडित कुटुंबाला भेटायचे आहे. हवे तर मला एकट्याला हाथरसला जाऊ द्यावे. एका व्यक्तीवर कलम १४४ लागू होत नाही असे आपण पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी ऐकले नाही. जायला लागल्यावर पोलिसांनी आपणास धमकी देत धक्का मारून खाली पाडले. आपल्यावर लाठ्या चालवल्या, असे राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.देशभरात संतप्त प्रतिक्रिया, ठिकठिकाणी निदर्शने
या सर्व घटनाक्रमाचे देशभरातून पडसाद उमटले. ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाही असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विविध पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी याविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. त्यावेळी मोदी व योगी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या गेल्या.Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या