व्यावसायिक स्पर्धेतून कृत्य; चौघांविरूध्द बोरगाव पोलिसात गुन्हा दाखल
Marathi News... सातारा : कमी दरात खडी व ग्रीट टाकत असल्याच्या गैरसमजुतीतून सातारा तालुक्यातील फत्यापूर येथील दिगंबर लक्ष्मण घाडगे या व्यावसायिकावर तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी त्याच गावातील आकाश शशिकांत घाडगे याच्यासह अज्ञात तिघांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिगंबर घाडगे व त्यांचा मित्र राहुल राजाराम घोलप हे दोघे मिळून खडी व ग्रीट विक्रीचा व्यवसाय करतात. तसेच संशयित आकाश शशिकांत घाडगे हाही हाच व्यवसाय करतो. दिगंबर घाडगे व त्याचा मित्र हे कमी दरात खडी व ग्रीट विकत असल्याचा गैरसमज आकाश घाडगे याला झाला. त्यातूनच त्यांच्यात वादावादी व शिवीगाळ झाली होती. सायंकाळी आकाश घाडगे याने दिगंबर घाडगे याला माफी मागायची आहे असे फोनवर सांगून त्याला व राहुल घोलप याला गावातील चौकात बोलावून घेतले.
हे दोघे चौकात आल्यावर तेथे एक चारचाकी गाडी उभी असल्याचे व त्यात आकाश घाडगेसह अज्ञात तीन लोक असल्याचे दोघांच्या निदर्शनास आले. यावेळी दोघेही आकाश घाडगे याला भेटायला गेले असता आकाशने गाडीतून तलवार काढून त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तलवार पाहून दोघांनी पळण्यास सुरुवात केली असता आकाश व त्याच्या साथीदारांनी त्यांचा पाठलाग केला.
यावेळी आकाश घाडगे याने तलवारीने दिगंबर घाडगे यांच्या हातावर व डोक्यात वार केले, तर अज्ञात तिघांनी लाकडी दांडक्याने त्यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दिगंबर घाडगे हा बेशुद्ध झाला. त्याला ग्रामस्थांनी उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयातून डिस्चार्ज दिल्यावर दिगंबर घाडगे यांने बोरगाव पोलीस ठाण्यात आकाश घाडगे व अज्ञात तिघांविरोधात फिर्याद दाखल केली. पुढील तपास सहाय्यक फौजदार बाजीराव पायमल करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या