विजेत्यांना मिळणार रोख पारितोषिके व ‘कोरोना योध्दा’ प्रशस्तिपत्र
Marathi News... सातारा : कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाने हाती घेतलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत कोरोना संसर्गापासून बचाव कसा करावा याबाबतची घरोघरी जावून जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीचा एक भाग म्हणून सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने फेसबुक प्रश्नमंजुषा, छायाचित्र तसेच व्हीडीओ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
फेसबुक प्रश्नमंजुषा स्पर्धा : ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी खुली राहील. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत 'कुटुंबाची साथ - कोरोनावर मात' या विषयावर सोशल मीडियावरील जिल्हा माहिती कार्यालयाच्या https://www.facebook.com/dioinfosatara या फेसबुक पेजवर प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येईल. या फेसबुक पेजवर दि. ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता प्रश्नावली विचारली जाईल. स्पर्धकाने या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. सर्वप्रथम अचूक उत्तर देणाNया स्पर्धकास विजेता घोषित केला जाईल.
छायाचित्र स्पर्धा : ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी खुली राहील. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत 'कुटुंबाची साथ - कोरोनावर मात' या विषयाचे छायाचित्र असावे. स्पर्धकाने छायाचित्र व त्यासोबत आपले नाव, वय, मोबाईल क्रमांक, पत्ता टाईप करुन दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत dio_satara@yahoo.com किंवा sataradio5@gmail.com या इमेल पत्त्यावर सादर करावे. सर्व प्राप्त छायाचित्रांची जिल्हास्तरावर परिक्षकांमार्फत परिक्षण केल्यानंतर निवड करण्यात येईल.
व्हीडीओ स्पर्धा : ही स्पर्धा जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी खुली राहील. 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' या उपक्रमांतर्गत 'कुटुंबाची साथ - कोरोनावर मात' या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीवर जास्तीत जास्त ५ मिनिटांपर्यंत व्हीडीओ तयार करावा. आपले व्हीडिओ पाठविताना सोबत आपले नाव, वय, मोबाईल क्रमांक, पत्ता टाईप करुन १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत dio_satara@yahoo.com किंवा sataradio5@gmail.com या इमेल पत्त्यावर सादर करावेत. प्राप्त व्हीडीओंचे परिक्षकांमार्फत परिक्षण करुन जिल्हास्तरावर पात्र स्पर्धकाची निवड करण्यात येईल.
या विविध स्पर्धेतील प्रथम क्रमांकास ५ हजार, द्वितीय क्रमांकास ३ हजार व तृतीय क्रमांकास २ हजार रुपये बक्षीस व 'कोरोना योध्दा' म्हणून प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या