कोरोनामुळे संकटात सापडलेल्या मल्लांच्या सहाय्यासाठी उपक्रम
Latest News In Marathi : कुस्ती हेच जीवन महासंघ, महाराष्ट्र राज्यतर्फे एक नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये भारतात प्रथमच ऑनलाइन कुस्ती मैदान व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष पै. रामदास देसाई व शिराळा तालुकाध्यक्ष पै मनोज मस्के यांनी ही माहिती दिली.
गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या महामारीमुळे कुस्ती क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. कुस्ती मैदाने व स्पर्धा बंद असल्यामुळे अनेक खेळाडूंवर उपासमारीची वेळ आली आहे.
खुराकासाठी तारेवरची कसरत
जोपर्यंत कुस्ती मैदान व स्पर्धा होत नाही तोपर्यंत कुस्तीगीर खेळाडूंना खुराकासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पूर्वी राजे महाराजे खुराकाचा खर्च करत होते. त्यामुळे पैलवानांना खुराखाची चिंता नसे. परंतु हल्ली स्वतःच स्वत:चा खर्च करून पैलवानकी करावी लागते. त्यामुळे हा खर्च करणे मुलांना पेलवत नसल्याने काहींनी अर्ध्यावरच कुस्ती सोडली आहे.
ऑलिंपिकमध्ये कुस्ती खेळात पदक येण्याच्या अपेक्षा आहेत. पण खुराकाअभावी पैलवानाला मध्येच कुस्ती सोडावी लागते हे दुर्दैव म्हणावे लागेल.
आता पूर्वीप्रमाणे राजे महाराजे नसले तरी जनतेने मल्ल व कुस्ती टिकविली पाहिजे या हेतूने या ऑनलाईन कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बक्षीसीतूनच कुस्ती टिकवणे शक्य
आपण दिलेल्या बक्षीसीतूनच कुस्ती टिकवली जाऊ शकते. त्यामुळे जी रक्कम द्याल त्या रक्कमेची कुस्ती लावली जाईल व आपण जमा केलेली रक्कम त्या पैलवानाला दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
क्रिकेट खेळातील आयपीएलच्या धर्तीवर लवकरच महासंघाच्या वतीने ऑनलाइन भव्य कुस्ती मैदान व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
माती व मॅट (गादी) या दोन्ही विभागात कुस्त्यांच्या लढती घेण्यात येणार आहेत. कोरोना संदर्भात शासनाच्या नियमांच्या अधीन राहून हे कुस्ती मैदान व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती सर्व कुस्ती शौकिनांना लवकरच कळवण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
ज्यांना कुस्ती मैदान, स्पर्धेसाठी आर्थिक अथवा खुराकाच्या स्वरूपात मद्दत करण्याची आहे त्यांनी ९५९४९९५०६५ , ९९६०७०६६६८ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
घरबसल्या घेता येणार आनंद
आयपीएलच्या धर्तीवर कुस्ती मैदान होईल. प्रत्येक तालुका, जिल्हा पातळीवर आखाड्यांमध्ये कुस्ती लढविली जाईल. अशा प्रकारे अनेक ठिकाणाहून या कुस्त्या लाईव्ह स्वरूपात घेतल्या जातील व प्रत्येक कुस्तीचा ईनाम पहिलवानाच्या खात्यात जमा केला जाईल.
यूट्युब व फेसबुकच्या माध्यमातून मैदानाचा आनंद घरी बसून घेता येईल. प्रत्येक कुस्ती ही पारदर्शक असेल. यामुळे पैलवानांचा किमान खुराकाचा प्रश्र्न सुटण्यास मदत होईल. मैदान हे वैयक्तीक स्वरूपात घेतल्यास त्या व्यक्तीच्या नावाने मैदान घेतले जाईल. तरी सर्वांनी ऑनलाईन मैदानासाठी सहकार्य करावे.
- पै. रामदास देसाई
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या