मारेकऱ्यांना मोक्का लावण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
Satara News : पुण्यातील युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांचा गुरूवारी मध्यरात्री १२ ते १ वाजण्याच्या सुमारास मोटरसायकलवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने सपासप वार करून निर्घृण खून केला.
पुण्यातील बुधवार पेठ परिसरात झालेल्या या थरारक घटनेने पुणे हादरले असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
दीपक विजय मारटकर हे पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातील युवा सेनेचे पदाधिकारी होते. त्यांचे वडील विजय मारटकर हे शिवसेनेचे नगरसेवक होते. दीपक मारटकर यांच्या खुनाबाबत गुन्हा रजिस्टर नंबर १०९४/२०२० भादवि कलम ३०२, १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३७ (१), १३५ अन्वये गुन्हा नोंद झाला आहे.
मारेकरी सराईत खुनी आहेत का याची चौकशी करा
दरम्यान, मारटकर यांच्या सर्व खुन्यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांना मोक्का लावावा तसेच हे सर्व खुनी सराईत आहेत का या अनुषंगानेही चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
यासंबंधी डॉ. गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना लेखी निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी यांना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात यावेत अशीही विनंती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी निवेदनात केली आहे.
- मारेकरी पळून जाताना त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ उपलब्ध करून घ्यावेत.
- सर्व खुनी व्यक्तींना तात्काळ अटक करावी.
- या खुनामागे कोणी सूत्रधार आहेत का याचाही शोध घ्यावा.
- खून केलेल्यांना जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कोठडी मागावी.
- खुनी व्यक्तीं यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत का हे तपासून त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करावी.
- या खुनी व्यक्तींना जास्तीत जास्त शिक्षा होईल हे पाहावे.
- तपास व चार्जशीट कार्यक्षम व काटेकोरपणे व्हावा.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता. आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या