RSS News In Pune : हिंदू संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन - सरसंघचालक


दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रतिपादन

RSS News In Pune : दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शन देखील केले. 

हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम बाळगले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पुणे येथे केले.

दत्तोपंत ठेंगडी जन्मशताद्बी समारोह समितीतर्फे आयोजित ‘दत्तोपंत ठेंगडी यांच्या दृष्टीतून सामाजिक समरसता’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, चिंतक आणि भारतीय मजदूर संघाचे संस्थापक महामंत्री दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिदिनी टिळक रोडवरील गोळवलकर शाळेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. 

अध्यक्षस्थानी समारोह समितीचे राष्ट्रीय सदस्य गोविंददेव गिरी महाराज होते. समितीचे संयोजक रवींद्र देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होते.

समरसतेच्या संदर्भातील विचार आत्मसात केले

डॉ. भागवत पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांचे समरसतेच्या संदर्भातील सर्व विचार दत्तोपंत ठेंगडी यांनी आत्मसात केले होते. एवढेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा निकटचा सहवास होता. या महनीय व्यक्तींचा सहवास व व्यासंगाने दत्तोपंत ठेंगडी यांची तयार झालेली व्यापक दृष्टी ही परंपरेशी अनुरूप होती आणि तीच दृष्टी संघाचीही आहे. 

समाजात जर उच्चनीचता असेल तर देश उभा राहू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते आणि हे मत ते आग्रहाने मांडायचे. त्यांचा दृष्टीकोन प्रामाणिक होता. त्यामागे कोणतेही राजकीय आडाखे नव्हते. समरसतेशिवाय समता शक्य नाही, त्यासाठी बंधुभाव आवश्यक आहे. 

समाजात आपल्यापेक्षा मागे राहिलेल्यांना उचलून वरती घेण्यासाठी थोडे झुकावे लागते तेव्हाच समाजात समरसता निर्माण होते. समरसता हा भाषणाचा विषय नाही तर तो आपल्या कृतीतून घडवून आणण्याचा भाग आहे, असे विचार त्यांनी मांडले.

विषमता संपवण्यासाठी बंधुभाव आवश्यक

आपल्या प्राचीन विचार परंपरेत एकरसतेचा भाव आहे. त्याच्या आधारे देशाचा विकास करण्यासाठी सामाजिक समरसता साधायची आहे. हिंसेच्या मार्गाने ती कधीही साधता येत नाही. शोषण करणारा नवा वर्ग तयार होतो, परिवर्तन होत नाही. विषमता संपवण्यासाठी बंधुभाव, सकारात्मक संवाद आणि प्रबोधन हे मार्ग आहेत. समरसता हे देशासमोरचे राष्ट्रीय ध्येय राहिले पाहिजे. 

त्यासाठी धैर्य आणि संयमाची आवश्यकता आहे. हे सर्व करत असताना सतत सावधानता बाळगली पाहिजे. कारण देशाचे तुकडे करण्याचे प्रयत्न करणाNयांच्या मनात एकरसतेचा भावच नाही. त्यामुळे आपल्या देशात असलेल्या विविधतेला विषमतेचा आधार बनू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या