कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गुन्हे उघड; आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता
Satara News : सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलिसांनी मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन युवकांना मुद्देमालासह अटक केली आहे. समीर सुदाम पाटील (वय २१) व विश्वजीत नानासो पाटील (वय २३, दोघे रा. कांदे, ता शिराळा) अशी संशयितांची नावे आहेत.
या संशयितांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व इस्लामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी मालमत्तेविरुध्दचे चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनानुसार शिराळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली के. टी. गावडे, नितीन यादव, डी. एच. नायकल, अरुण कानडे, नितीन घोरपडे, रणजीत टोमके, तुषार जाधव हे गस्त घालत असताना कांदे गावामध्ये विना नंबरप्लेटच्या मोटर सायकलवरुन दोन संशयित तरुण फिरत असताना मिळून आले.
त्यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता समीर सुदाम पाटील, विश्वजीत नानासो पाटील यांनी शिराळा शहरातून दि. १६ ऑक्टोबर रोजी शाईन मोटरसायकल चोरी केली असल्याची कबुली दिली.
त्यांना अटक करुन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता समीर पाटील याने बच्चे सावर्डे (ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) येथून हिरोहोंडा स्प्लेंडर मोटर सायकल व जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथून एक स्प्लेंडर मोटर सायकल चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत लक्ष्मीपुंरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
या चोरट्यांना पकडण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली के. टी. गावडे, नितीन यादव, डी. एच. नायकल, अरुण कानडे, नितीन घोरपडे, रणजीत टोमके, तुषार जाधव यांचा सहभाग होता.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या