Satara News : दुष्काळी खटाव तालुक्यातील प्राजक्ताची एम्समध्ये निवड


एकलव्याप्रमाणे यशाला गवसणी घालून प्राजक्ताने तालुक्याचा लौकिक वाढवला : देशमुख

Satara News : शिवरत्न शिक्षण संस्था संचलित अकलूज येथील विजयसिंह मोहिते - पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनी प्राजक्ता पानस्कर हिने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदासाठी झालेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ९८.४५ टक्के गुण मिळवून देशात १५१४ वी रँक प्राप्त केली. 

तिची नर्सिंग ऑफिसर म्हणून निवड झाली आहे. या यशाबद्दल हरणाई सूतगिरणीचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख (भैय्यासाहेब) यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

प्राजक्ता ही दुष्काळी खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी येथील वारकरी सांप्रदायाचा वारसा असणाNया रंगराव पानस्कर यांची नात व बनपुरीच्या जि. प. शाळेतील उपशिक्षक दत्तात्रय पानस्कर यांची कन्या आहे. 

अपुरी साधने, मार्गदर्शनाचा अभाव अशा अवस्थेत एकलव्याच्या भूमिकेतून तिने एम्सच्या नर्सिंग ऑफिसर पदाला गवसणी घालून तालुक्याचा नावलौकिक वाढवला असल्याचे उद्गार रणजीतसिंह देशमुख यांनी यावेळी काढले. 

याप्रसंगी अभिषेक रावत, सूर्याचीवाडी येथील माजी सरपंच दत्ता कदम, रामभाऊ घोलप, संजय घार्गे - देशमुख, दत्तात्रय पानस्कर, हरणाई सूतगिरणीचे सरव्यवस्थापक रमेश भोसले, माणदेशी सूतगिरणीचे सरव्यवस्थापक सयाजी सुर्वे, हरणाईचे प्रॉडक्शन मॅनेजर अमृत मट्टकली, गुलाबराव जगदाळे, गायकवाड, सुनील माने, अशोक सुर्वे, विनोद जगदाळे, निलेश घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

२१ हजार रूपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस 

दरम्यान, या अपूर्व यशाबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील, संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते - पाटील, उपाध्यक्ष शीतलदेवी मोहिते - पाटील यांनी २१ हजार रूपये प्रोत्साहनपर बक्षीस देऊन प्राजक्ता पानस्कर हिचा सत्कार केला.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या