पक्षकारांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त अनोखा उपक्रम
Satara News : माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने आज कौटुंबिक न्यायालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्रात प्रथमच येथील कुटुंब न्यायालयात पक्षकारांसाठी ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे.
जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते, बालाजी वाचनालयाचे संस्थापक प्रताप गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रमुख न्यायाधीश गोविंद वायाळ हे होते.
कुटुंब न्यायालयात येणारे पक्षकार हे मानसिकरित्या खचलेले असतात. त्यांच्या मनात अनेक नकारात्मक विचार सुरु असतात. न्यायालयात आले असताना ते प्रचंड तणावाखाली दिसून येतात. अशावेळी त्यांनी नकारात्मक विचार सोडून सकारात्मक रहावे यासाठी प्रतिक्षा कक्षामध्ये एक ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. जेणेकरुन ते चांगली पुस्तके वाचू शकतील आणि आपला तणाव, चिंता, नैराश्य दूर करु शकतील हा त्यामागचा उद्देश आहे.
न्यायाधीश गोंविद वायाळ यांनी अध्यक्षीय भाषणात वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश सांगितला. युवराज पाटील यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच गोरे यांनी ग्रंथालयाविषयी माहिती सांगून ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. कार्यक्रमास विवाह समुपदेशक डॉ. शेखर पांडे, विधीज्ञ, पक्षकार, कर्मचारी उपस्थित होते.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या