Satara News-चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार गमावल्याने सातारकर गहिवरले
Satara News : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक, प्रसिद्ध चित्रपट निर्माते, मराठी - हिंदी चित्रपटांचे वितरक व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक मधुकर उद्धव तथा अण्णा देशपांडे {वय ७४} यांचे आज पहाटे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, महेश व दिनेश ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या इच्छेखातर काल मध्यरात्रीनंतर त्यांना सातारला आणले जात असताना आनेवाडीजवळ त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शिवसेना परिवार व चित्रपट सृष्टीत दुःखाची छाया पसरली. अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले.
शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रभावित
अण्णा देशपांडे यांचे मूळ गाव जावली तालुक्यातील रायगाव. पण अनेक वर्षांपासून त्यांचे सातारा शहरात वास्तव्य होते. धडाडीचे व परखड बोलणारे धडाडीचे शिवसैनिक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शिवसेनेसाठी वाहून घेतले होते. काही काळ त्यांनी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती. अनेक आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे.
जिल्ह्यात शिवसेना वाढावी ही त्यांची तळमळ होती. याच भूमिकेतून त्यांनी शिवसेनेच्या बैठका, मेळावे यासाठी स्वतःचे मंगल कार्यालय हवे तेव्हा उपलब्ध करून दिले. शिवसेनेवर त्यांची इतकी श्रध्दा होती, की त्यांच्या हॉटेलचे प्रवेशद्वारही त्यांनी धनुष्याच्या आकाराचे बनवले आहे. सातारकरांच्या सेवेसाठी अनेक वर्षांपासून त्यांनी रूग्णवाहिकाही ठेवली आहे.
अजरामर चित्रपटांची निर्मिती
चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचे ते साक्षीदार होते. जवळपास तीस वर्षे त्यांनी मराठी - हिंदी चित्रपटांचे वितरक म्हणून काम पाहिले. या काळात गावोगावी जावून त्यांनी १६ एमएम मशिनद्वारे चित्रपट प्रदर्शन केले. या अनुभवाच्या जोरावर ते चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरले.
’तांबव्याचा विष्णू बाळा’, ’सख्खा भाऊ पक्का वैरी’, ’बेभान’, ’जखमी कुंकू’ या या अनुभवाच्या जोरावर ते चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरले.
’तांबव्याचा विष्णू बाळा’, ’सख्खा भाऊ पक्का वैरी’, ’बेभान’, ’जखमी कुंकू’ या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यातील ’तांबव्याचा विष्णू बाळा’, ’सख्खा भाऊ पक्का वैरी’ हे त्यांचे चित्रपट तुफान यशस्वी झाले. त्यांना लोकप्रियता मिळाली आणि आणि विविध पारितोषिकांच्या रूपाने राजमान्यताही लाभली.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या