Satara News : ‘एनी’ डाऊनलोड करायला सांगून ‘मनी’ लंपास


साताऱ्यातील महिलेची ९८ हजारांची फसवणूक; शहर पोलिसात गुन्हा दाखल

Satara News : गुगल पे कस्टमर केअरमधून बोलत असल्याची बतावणी करून मोबाईल रिचार्जला गेलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने वैशाली सुधीर कांबळे (रा. विलासपूर, ता. सातारा) यांची ९८ हजार ४६२ रुपयांची फसवणूक केली. 

या भामट्याने वैशाली कांबळे यांना 'एनी डेस्क' हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करायला सांगून त्याद्वारे त्यांच्या बँक खात्यातील रक्कम काढून घेतली. याप्रकरणी वैशाली कांबळे यांच्या फिर्यादीवरून अरविंद कुमार नावाच्या भामट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

मोबाईल क्रमांक ७३६४८००३२८ वरून कांबळे यांच्या मोबाईल क्रमांकावर कॉल आला. आपण गुगल पे कस्टमर केअर सेंटरमधून अरविंद कुमार बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेलेले पैसे परत मिळवण्यासाठी मोबाईलमध्ये एनी डेस्क हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करा, असे त्याने सांगितले.

अ‍ॅपच्या माध्यमातून केले खाते रिकामे

त्यानुसार वैशाली कांबळे यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ते अ‍ॅप डाऊनलोड केले. त्या अ‍ॅपच्या माध्यमातून संशयिताने आयडीबीआय बँकेतील कांबळे यांच्या खात्याचा अ‍ॅक्सेस मिळवला. या खात्यातून संशयिताने ९८ हजार ४६२ रुपये काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या