Satara News : सातारच्या गल्लीबोळात भटक्या कुत्र्यांची दहशत


बंदोबस्त न केल्यास कुत्र्यांना नगरपालिकेत सोडण्याचा इशारा

Satara News : सातारा शहरांमध्ये अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. सातारा नगरपालिकेने या भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. अन्यथा येत्या पंधरा दिवसात नगरपालिकेच्या कार्यालयात कुत्री सोडण्यात येतील, असा इशारा भाजपच्या नगरसेविका आशा पंडित यांनी दिला आहे. 

आशा पंडित यांनी यासंदर्भात नगराध्यक्षांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे, गल्लीबोळात कुत्र्यांच्या टोळ्या निर्माण झाल्या असून त्यांच्या दहशतीमुळे महिला वर्ग प्रचंड घाबरला आहे. बाजारपेठेमध्ये नागरिकांना, महिला व मुलांना फिरणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात जाण्यासारखे झाले आहे. 

शहरात अशी भटकी कुत्री कमीत कमी ५ हजार असून त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा. अन्यथा मोकाट कुत्र्यांना आरोग्य विभागात आणून सोडले जाईल. 

खेळण्यातील कुत्री सप्रेम भेट

याची आपणास आठवण रहावी यासाठी लहान मुलांच्या खेळण्यातील कुत्री सप्रेम भेट देत आहोत. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा. अन्यथा जिवंत कुत्रे आपणास भेट देण्यात येईल, असे पंडित यांनी यावेळी सांगितले. लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होण्याआधी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. 

कोल्हापूर, पुणे येथून डॉग व्हॅन भाडेतत्त्वावर घेऊन मोकाट कुत्रे पकडून कोयना अभयारण्यात किंवा चांदोली अभयारण्य सोडावे अशी मागणीदेखील या निवेदनाद्वारे केली आहे.


Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या