साताऱ्यात ११ ऑगस्टपासून आरटीपीसीआर लॅबचे अव्याहत काम
Satara News : सातारच्या क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय लॅबमध्ये आजच्या तारखेपर्यंत २० हजार २३६ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात ७६१४ एवढे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर ११ हजार ४३२ एवढे निगेटिव्ह निघाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सुरूवातीच्या काळात जिल्ह्यात चाचण्यांच्या बाबतीत पुरेशी व्यवस्था नव्हती. त्यामुळे चाचण्यांचे अहवाल येण्यास वेळ लागत होता. त्याचा एकूणच उपचारावर परिणाम होत होता. त्यामुळे जिल्हा रूग्णालयात ११ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर लॅब सुरु करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत अविरत काम सुरु आहे.
यासाठी १२ तंत्रज्ञ, २ डॉक्टर, २ डेटा ऑपरेटर आणि तीन कार्यालयीन सहाय्यकांच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. आजपर्यंत फक्त ३७४ एवढे नमुने बाद झाले आणि ८११ एवढे नमुने अनिर्णित राहिले असल्याची माहिती पॅथॉलॉजिस्ट डॉ. सारिका बडे, मायक्रोबायलॉजिस्ट डॉ. तेजस्विनी पाटील, डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी दिली.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या