कार्याने राज्याला दिशा; येळीवच्या हरणाई सूतगिरणीला भेटीप्रसंगी उद्गार
दुष्काळी भागात साकारलेली ही औद्योगिक क्रांती पाहून राजेंद्र मुळक भारावून गेले. कोणताही राजकीय वारसा नसताना या भागात रणजितसिंह देशमुख यांनी स्वत:च्या आत्मविश्वासावर हे प्रकल्प उभारून राज्याला दिशा देणारे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे उद्गार मुळक यांनी याप्रसंगी काढले.
रणजितसिंह मला भावासारखे असून त्यांची कार्यपद्धती व धडपड खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांची या भागाबद्दलची ओढ व समाजकारण आपण जवळून पाहिले आहे. त्यांची विचारसरणी व राजकीय दबदबा खटाव - माण तालुक्याला नवी दिशा व उर्जा प्राप्त करून देईल यात तीळमात्र शंका नाही, अशा शब्दात त्यांनी रणजितसिंह देशमुख यांच्या कार्याची स्तुती केली.
नेतृत्वाला लवकरच संधी प्राप्त होईल
या भागात नवनवे प्रकल्प उभारून येथील शेतकरी व बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची सतत धडपड सुरू असते. अशा नेतृत्वाला लवकरच संधी प्राप्त होईल व या भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी रणजीतसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक केले. हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या प्रगतीबद्दल बोलून त्यांनी साखर कारखान्याविषयी विस्तृतपणे माहिती दिली. तर सूतगिरणी उभारताना राजेंद्र मुळक यांनी केलेल्या मदतीची उदाहरणासहित आठवण करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरव्यवस्थापक रमेश भोसले यांनी केले, तर राजकुमार चौगुले यांनी आभार मानले. यावेळी निलेश घार्गे, अमृत मटकल्ली, अजय गुरसाळे, सयाजी सुर्वे आदिंची उपस्थिती होती.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या