विकास आयफाय फाऊंडेशनतर्फे कवठेतील गरजू विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण
Satara News : ग्रामीण भागात क्रांती आणून हा परिसर आधुनिक बनविणे हा उद्देश आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना दिलेले मोबाईल टॅब त्यांच्यासह देशाच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन पुणे येथील विकास आयफाय फाऊंडेशनचे अध्यक्ष अर्णव बन्सल यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील कवठे (मसूर) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयामध्ये विकास आयफाय फाऊंडेशनतर्फे २५ होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल टॅबलेटचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
यावेळी निखिल बन्सल, फाऊंडेशनचे उपाध्यक्ष अय्यान शेख, जगदीश कळसकर, शाम - शरद शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सुनीलराव पाटील, खजिनदार आनंदराव यादव, उपसरपंच अशोकराव पाटील, संचालक दिलीपराव यादव, मुख्याध्यापक जे. एम. शिंदे, निवृत्त पोलीस अधिकारी संभाजीराव यादव, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख, ज्ञानेश्वर यादव, सागर कळसकर, संजय साळुंखे यांच्यासह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
छोट्या गावातच जन्मलेल्या धीरूभाई अंबानी यांनी परिस्थितीवर मात करत महत्त्वाकांक्षा व अपार कष्टाच्या जोरावर क्रांती घडविली. 'जब पढेगा इंडिया, तो बढेगा इंडिया' या उक्तीप्रमाणे कार्य साफल्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन बन्सल यांनी केले.
टॅबलेट शैक्षणिकदृष्ट्या चांगले उपकरण असून त्याद्वारे इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्याही लहान - मोठ्या परीक्षेची तयारी करून आपण यश मिळवू शकतो, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात हातभार
कोरोना महामारीमुळे शासनाने ‘शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण चालू’ असा निर्णय घेतल्याने समाजातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. परंतु विकास आयफाय संस्थेने २५ विद्यार्थ्यांना टॅबलेट देऊन त्यांच्या शैक्षणिक विकासात हातभार लावला असल्याचे सांगून सुनीलराव पाटील यांनी त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
उपशिक्षक प्रदीप पाटील, माजी विद्यार्थी जगदीश कळसकर, शिवानी यादव यांनी मनोगत व्यक्त केले, तर विजय चव्हाण, वैष्णवी वायदंडे, सृष्टी यादव या विद्यार्थ्यांनी आमच्यासाठी टॅब उपयुक्त असून विद्यालयाची १०० टक्के निकालाची परंपरा अबाधित राखू, असे सांगितले.
मुख्याध्यापक जे. एम. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्रप्रसाद चव्हाण यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक दिलीप माने यांनी केले, तर उपशिक्षक सुनील साळुंखे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश सूर्यवंशी, नितीन यादव, दीपक दाभाडे यांनी परिश्रम घेतले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या