जिल्हा बँकेच्या प्रयत्नांना यश; उर्वरित २ वर्षांचीही रक्कम मिळण्यासाठी प्रयत्नशील
Satara News : सातारा जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी १ टक्का अर्थसहाय्य निधी देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०१४ - १५ वर्षासाठी पाठवलेल्या प्रस्तावापोटी ३ कोटी ४ लाख ९५ हजार रूपये मंजूर सरकारने केले आहेत.
ही रक्कम लवकरच संबंधीत विकास सेवा संस्थांना मिळणार आहे. उर्वरित २ वर्षांचीही रक्कम मिळण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असे बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
तळागाळातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना सेवा देणाऱ्या विकास सेवा संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिल्हा बँक व राज्य शासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. पीक कर्ज वाटपात विकास सेवा संस्थांचे नुकसान होत असल्याने जिल्हा बँकेने केलेल्या पाठपुराव्यास अनुसरून राज्य शासनाने विकास संस्था सक्षमीकरणासाठी पीक कर्ज वाटपावर १ टक्का अर्थसहाय्य निधी देण्याचा निर्णय सप्टेंबर २०१४ मध्ये घेतला आहे.
शासनाकडे सादर केले होते प्रस्ताव
त्यास अनुसरून सन २०१४ - १५ या वर्षात ६९२ विकास सेवा संस्थांना ४ कोटी ७२ लाख १६ हजार, सन २०१५ - १६ मध्ये ७४७ विकास संस्थांना ५ कोटी ३१ लाख ९४ हजार व सन २०१६ - २०१७ मध्ये ७२९ विकास सेवा संस्थांना ४ कोटी ९३ लाख असे एकूण १४ कोटी ९७ लाख ११ हजार रूपये अनुदान मागणी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. मात्र गत ६ वर्ष हे प्रस्ताव शासन स्तरावरून प्रलंबित होते.
जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या दृष्टीने सक्षमीकरण निधी वेळेत प्राप्त होणे आवश्यक असल्याने जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, संचालक आमदार मकरंद पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजपुरे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत बैठक झाली.
सक्षमीकरणासाठी विकास सेवा संस्थांना १ टक्का निधी देण्याची आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली होती. या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून नुकतेच राज्य शासनाने सन २०१४ - १५ वर्षासाठी पाठवलेल्या प्रस्तावापोटी ३ कोटी ४ लाख ९५ हजार रूपये मंजूर केले आहेत, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
दीर्घकाळ प्रलंबित असलेला सक्षमीकरण निधी प्राप्त होणार असल्याने संस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून जिल्ह्यातील विकास सेवा संस्था तसेच सातारा जिल्हा गटसचिव संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मुलाणी यांनी जिल्हा बँक व शासनाचे आभार मानले आहेत.
विकास सेवा संस्थांसाठी लवकरच आदर्श संगणक प्रणाली
जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांच्या सक्षमीकरणासाठी सातारा जिल्हा बँकेमार्फत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी सभासदांना कर्ज भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी बँक आपल्या ढोबळ नफ्यातून १ ते ३ लाखावरील अल्पमुदत कर्जावर २ टक्के व्याज सवलत देते. तसेच विकास सेवा संस्थांना आतापर्यंत प्रती संस्था २ लाख ८३ हजार ३०० रूपये वसुली प्रोत्साहन निधी देण्यात आला आहे. तसेच विकास सेवा संस्थांच्या सचिवांना बँकेमार्फत प्रतिवर्षी एक पगार बोनस दिला जातो. संस्था संगणकीकरणासाठी बँकेमार्फत नाबार्डकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच विकास सेवा संस्थांसाठी आदर्श संगणक प्रणाली विकसित केली जाणार आहे.
- डॉ. राजेंद्र सरकाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या