Satara News : विकास सेवा संस्थांनी बहुउद्देशीय सेवा केंद्र योजनेद्वारे प्रगती करावी


पारंपरिक वाटेवर चालत राहण्यापेक्षा सक्षमीकरणासाठी ‘वेगळी वाट’ही चोखाळावी

Satara News : स्पर्धात्मक युगात फक्त शेतीपूरक व्यवसायच नव्हे, तर शेती सोडून अन्य व्यवसायही सुरु करून प्राथमिक विकास सेवा संस्थांचे उत्पन्न वाढवावे व संस्था सक्षम कराव्यात. 

त्यासाठी या सेवा संस्थांनी नाबार्ड पुरस्कृत विकास सोसायट्यांच्या बहुउद्देशीय सेवा केंद्र योजनेचा लाभ घेऊन प्रगती करावी, असे आश्वासन विधान परिषदेचे सभापती व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक रामराजे नाईक - निंबाळकर यांनी दिले.

विकास सेवा संस्थांनी यापुढे पारंपारिक व्याजावर अवलंबून राहून व्यवसाय करण्यापेक्षा उत्पन्नाचे अन्य स्त्रोत शोधावेत, यासाठी नाबार्ड पुरस्कृत विकास सोसायट्यांचे बहुउद्देशीय सेवा केंद्र म्हणून परिवर्तन करण्याच्या योजनेचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरुपात बँक सलग्न १० विकास सेवा सोसायट्यांच्या चेअरमन / सचिव यांच्या उपस्थितीत रामराजे यांच्या हस्ते बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात करण्यात आला. त्यावेळी रामराजे बोलत होते.

एकत्रित सभेचे आयोजन

जिल्ह्यातील विकास सेवा संस्था सक्षमीकरणासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्पâत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून सातारा जिल्हा बँक, राज्य सहकारी बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने बँकेच्या मुख्य कार्यालयात एकत्रित सभा आयोजित केली होती. 

बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषद सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील, अनिल देसाई, प्रकाश बडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, तसेच विकास सेवा सोसायट्यांचे चेअरमन व सचिव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

उत्पन्नाचे अन्य स्त्रोत शोधावेत 

विकास सेवा संस्थांनी यापुढे पारंपारिक व्याजावर अवलंबून राहून व्यवसाय करण्यापेक्षा उत्पन्नाचे अन्य स्त्रोत शोधावेत, यासाठी नाबार्ड पुरस्कृत विकास सोसायट्यांचे बहुउद्देशीय सेवा केंद्र म्हणून परिवर्तन करण्याच्या योजनेचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरुपात बँक सलग्न १० विकास सेवा सोसायट्यांच्या चेअरमन / सचिव यांच्या उपस्थितीत यावेळी रामराजे यांच्या हस्ते बँकेच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात करण्यात आला. 

जिल्ह्यातील सर्व विकास संस्था संगणकीकृत करण्याचा बँकेचा मानस आहे. विकास संस्थांनी मानसिकता बदलावी. भविष्यात काहीही होऊ शकते, आर्थिक अडचणी येऊ शकतात. यासाठी आपण सक्षम असले पाहिजे याचा विचार करून पुढील दिशा ठरविण्याची हीच वेळ आहे. यासाठी बँकेच्या व नाबार्डच्या योजनांचा लाभ सोसायट्यांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने यांनी यावेळी केले.

दोन्ही योजनांचा लाभ संस्था घेऊ शकतात 

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी नाबार्डची महत्त्वाकांक्षी योजना 'विकास सेवा सोसायट्यांचे बहु सेवा केंद्र' बाबत बैठक बोलावण्यामागचा हेतू स्पष्ट केला. या योजनेसाठी सातारा जिल्हा बँकेची निवड केल्याची बाब अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. 

विकास सेवा संस्थेसाठी असणाNया पीएसीएस अ‍ॅज एमएससीएस तसेच अ‍ॅग्रिकल्चर इन्प्रâास्ट्रक्चर पंâड (एआयएफ) या दोन्ही योजनातील फरक स्पष्ट केला. संस्थांनी या योजना समजून घ्याव्यात. या दोन्ही योजनांचा लाभ विकास संस्था घेऊ शकतात. यासाठी कर्ज घेताना विकास सेवा संस्थांनी व्यवसायाची योग्य निवड करून तसेच व्यवसायाचा वाव विचारात घेऊन आवश्यक तेवढेच कर्ज घ्यावे, असे सांगितले. 

नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक अभ्यंकर यांनी याप्रसंगी नाबार्ड पुरस्कृत विकास सोसायट्यांचे बहुउद्देशीय सेवा केंद्र म्हणून परिवर्तन करण्याच्या योजनेची विस्तृत माहिती उपस्थित सोसायटी प्रतिनिधीना दिली. तसेच बँकेचे सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे यांनी प्रास्ताविकामध्ये योजनेची थोडक्यात माहिती दिली. शेती कर्ज विभागाचे उपव्यवस्थापक भंडारे यांनी आभार मानले.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या