अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दि. १९ ते २१ ऑक्टोबरदरम्यान आयोजन
Satara News : जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दि. १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य स्वाती इथापे यांनी ही माहिती दिली.
सन २०१९ - २० मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले आहेत व जे विद्यार्थी सन २०२० - २०२१ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छितात, त्यातील काही अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत.
पूर्तता नसल्याने अर्ज प्रलंबित
या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी अर्जदारांना त्यांच्या पत्त्यावर पत्राने तसेच मोबाईलवर एसएमएसद्वारे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी कळविले आहे. तथापि काही विद्यार्थ्यांनी या कार्यालयाने कळविलेल्या त्रुटींची अद्याप पूर्तता केली नसल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.
या अर्जांची पूर्तता करण्यासाठी ही मोहीम आयोजित केली आहे. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जुनी एमआयडीसी रोड, सातारा या कार्यालयात हे कामकाज चालणार आहे, असे इथापे यांनी सांगितले.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या