Satara News : कोरोनाचे ११३ रूग्ण वाढले, तर ६ जणांचा मृत्यू


जिल्ह्यातील बळींच्या संख्येने ओलांडला दीड हजारांचा टप्पा

Satara News : सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा आलेख उतरणीला लागला असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. रूग्णवाढीचा आणि रूग्ण दगावण्याचा वेग कमी झाला आहे. तथापि, आजअखेर कोरोनामुळे दगावणाऱ्यांची संख्या दीड हजारच्या पुढे गेली आहे. 

रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यात कोरोनाचे ११३ रूग्ण वाढले असून काला रात्रीपासून ६ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

कोरोना बाधित अहवालामध्ये...

सातारा तालुका : सातारा १३, मंगळवार पेठ ५, शनिवार पेठ १, केसरकर पेठ १, यादोगोपाळ पेठ १, करंजे पेठ ३, गोडोली २, तामजाईनगर १, पिरवाडी १, बोरखळ १, मत्यापूर १, खेड २, वळसे १, गुजरवाडी १, वाघोशी १, लिंब ३, चिचणेर १, विकासनगर १, चिंचनेर वंदन २.

कराड तालुका : कराड १, उंब्रज १, मलकापूर ३, तुळसण १, शेरे ४, वाठार ३.

फलटण तालुका : गोळीबार मैदान २, दलवाडी ३, तरडगांव १, गिरवी ५, तडवळे १, ढवळेवाडी २.

वाई तालुका : सह्याद्रीनगर १, सुरुर १, चिंधवली १.

महाबळेश्वर तालुका : गोडवली २.

खटाव तालुका : खटाव १, पुसेगाव ३, सिध्देश्वर कुरोली १, वर्धनगड ५, निढळ १, गारवडी १, वर्धनगड १.

माण तालुका : दिवड १, माळवाडी १, बिदाल १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव १, ल्हासुर्णे १, रहिमतपूर १, सोनके १.

जावली तालुका : केडांबे १, आंबेघर १, केळघर १, कुसुंबी १, मेढा १, सांगवी १, आगलावेवाडी ७.

जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये येळगाव (ता. कराड) येथील ६५ वर्षीय महिला, जिल्हा कोविड रुग्णालय येथे डोकळवाडी (ता. खटाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, केसरकर पेठ (सातारा) येथील ७२ वर्षीय महिला, खटाव येथील ६३ वर्षीय पुरुष, रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथील ७६ वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रूग्णालयांमध्ये कुडाळ (ता. जावली) येथील ७० वर्षीय पुरुष अशा ६ एकूण कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १८०५६८
  • एकूण बाधित - ४५३७३  
  • घरी सोडण्यात आलेले - ३९१५७  
  • मृत्यू - १५०३ 
  • उपचारार्थ रुग्ण - ४७१३

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या