सिव्हीलमधील कोरोना बाधितांना जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये हलवण्याची मागणी
Satara News : जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना सर्व सोयींनी युक्त असलेल्या जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवावे आणि जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर सर्व आजारातील रुग्णांवर उपचार सुरु करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
जिल्ह्यातील गोरगरीब लोकांना खासगी हॉस्पिटल्सचा खर्च परवडत नसल्याने विविध प्रकारच्या आजारांसाठी जिल्हा रुग्णालयाचाच मोठा आधार असतो. या रुग्णालयात दररोज हजारो रुग्णांची तपासणी आणि उपचार सुरु असतात.
ह्रदयविकार, डायलेसीस, सर्पदंश, भाजलेले रुग्ण, प्रसुती यासह इतर सर्व प्रकारच्या गंभीर रुग्णांना गेल्या सात - आठ महिन्यांपासून उपचाराविना रहावे लागत असून त्यांचे अतोनात हाल होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
रुग्णांना उपचार मिळणे आवश्यक
जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचारासाठी १५८ बेड तयार करण्यात आले. त्यामध्ये आयसीयूमधील २० बेडचाही समावेश आहे. जिल्हा प्रशासनाने जंबो कोविड हॉस्पिटल उभारले असून सोमवारपासून हे सेंटर सुरु होणार आहे. या सेंटरमध्ये ५० बेड व्हेंटीलेटरयुक्त तर २५० बेड ऑक्सिजनच्या सुविधेने युक्त असून या सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांप्रमाणेच इतर सर्व प्रकारच्या व्याधीने गंभीर आजारी गोरगरीब रुग्णांना तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कोरोना बाधित रुग्णांना जंबो कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवल्यास त्यांना या सेंटरमध्ये दर्जेदार सुविधा उपलब्ध होईल आणि त्यांच्यावर चांगले उपचार होतील.
तसे झाल्यास जिल्हा रुग्णालयात पूर्वीप्रमाणे इतर व्याधीग्रस्त रुग्णांना उपचार मिळणे सोपे होईल, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या