नेले गावातील चार जणांविरूध्द सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल
Satara News : मूळ हिस्सेदार म्हणून बोगस व्यक्ती खऱ्या असल्याचे भासवून मिळकतीचा बनावट दस्त केल्याचा प्रकार साताऱ्यात उघडकीस आला आहे.
यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील नेले येथील चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव व एक अन्य एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सहाय्यक दुय्यम निबंधक (वर्ग २) विजय शहाजी जगताप (वय ५२, रा. नितीराज निवास, अहिरे कॉलनी, देगाव रोड, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. २०१९ मध्ये बोगस दस्त झाल्याची तक्रार नेले येथील रामदास गुलाबराव जाधव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात दिली होती.
त्यानुसार या कार्यालयाने तपासणी व चौकशी केली असता ७ जून २०१० रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात गट नंबर ६११ या मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावरील सहहिस्सेदार मधुकर यदू पवार, मारुती यदू पवार व छबुबाई दशरथ निकम होते.
परंतु ३२ ग विक्री प्रमाणपत्र नोंदणीकामी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग २, सातारा यांच्यासमोर मारुती यदू पवार यांच्या जागी अनोळखी बोगस व्यक्ती व मधुकर यदू पवार यांच्या जागी नेले येथील जगन्नाथ गणपती जाधव या व्यक्तीला उभे करून जबाब दिले गेले होते.
फसवणुकीत संशयितांना साथ
दस्त नोंदणी करताना संगणकावर बोगस व्यक्तीचे फोटो घेऊन, ओळख पटवून देणारे व साक्षीदार म्हणून चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव हे उपस्थित होते. दस्त नोंदणीवेळी मारुती व मधुकर यदू पवार यांची सहहिस्सेदार बहीण उपस्थित असताना त्यांनीदेखील या फसवणुकीत संशयितांना साथ दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव, छबुबाई दशरथ निकम व अनोळखी व्यक्तींनी संगनमताने बनावट दस्ताची नोंदणी केली करून, हा दस्त लिहून घेणारे म्हणून मधुकर यदू पवार यांच्याऐवजी जगन्नाथ गणपती जाधव यांना उभे करून बनावट दस्त नोंदणी केल्याचे सुनावणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे तपास करत आहेत.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या