Satara News : इस्त्रोने घेतलेल्या स्पर्धेत भरतगावची समृध्दी देशात अकरावी


हा बहुमान मिळवणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी

Satara News : सातारा : इस्त्रोने देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या 'सायबर टेस्ट कॉम्पिटिशन'मध्ये सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये बारावीत शिकत असलेल्या समृद्धी सत्यनारायण शेडगे हिने ११ वा क्रमांक पटकावला आहे. हा बहुमान मिळवणारी ती पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.

पुढील दोन दशकात अंतराळात कोणती आव्हाने येतील असा प्रश्न उपस्थित करत इस्त्रोने ही हिंदी भाषेतील निबंध स्पर्धा आयोजित केली होती. याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इस्त्रोने या स्पर्धेसाठी लाखो विद्यार्थ्यांमधून केवळ दोन हजार २९८ विद्यार्थ्यांची निवड केली. त्यात महाराष्ट्रातील १५६ स्पर्धकांचा समावेश असून निम्म्याहून अधिक मुली आहेत. या मुलींमध्ये समृध्दीचा समावेश आहे. 
 
पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा महानगरातील विद्यार्थ्यांना मागे टाकत सातारसारख्या निमशहरी गावात शिकणाऱ्या आणि भरतगावसारख्या खेड्यात राहणाऱ्या समृद्धीने हिंदी भाषेत लिहिलेल्या निबंधाची निवड करण्यात आली आहे.

समृध्दीचा आम्हाला सार्थ अभिमान

समृद्धी शेडगे हिने मिळवलेले यश देदीप्यमान असून आमच्या महाविद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थिनीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. लवकरच तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार आयोजित करण्याचा मानस प्राचार्य बी. टी. जाधव यांनी व्यक्त केला.

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या