Satara News : रविवारी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये सुरू राहणार


या सुविधेचा लाभ घेण्याचे नवीन वाहने खरेदी करणाऱ्यांना आवाहन

Satara News : रविवार दि. २५ रोजी सार्वजनिक सुट्टी असूनदेखील राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये सुरू राहणार आहेत. या दिवशी कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणी व कर संकलनाचे कामकाज सुरू राहणार आहे.

रविवारी दसरा असून या दिवशी सर्वत्र नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. दसऱ्याच्या दिवशी या नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा तसेच त्या अनुषंगाने शासकीय महसूल जमा व्हावा यासाठी राज्यातील सर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालये या दिवशी सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती सातारचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुधीर चौधरी यांनी पत्रकाद्वारे दिली.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असे म्हणतात. साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक पूर्ण मुहूर्त असल्याने लोक महत्वाचे व्यवहार, महत्वाची खरेदी या दिवशी करतात. याच दिवशी या गोष्टी पूर्ण व्हाव्यात ही लोकांची भावना असते. ही लोकभावना विचारात घेऊनच उपप्रादेशिक परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन चौधरी यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या