Satara News : एटीएम मशिनची छेडछाड; २.३५ लाख लंपास


साताऱ्यात एसबीआयच्या पाच एटीएममधून पैसे काढून फसवणूक

Satara News : एटीएम मशिनची छेडछाड करत दि. ७ ते २३ सप्टेंबर या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातारा येथील पाच एटीएम मशिनमधून ट्रान्झॅक्शन करत अज्ञाताने सुमारे २ लाख ३५ हजार रुपये लंपास केले.

याबाबत बँकेचे मॅनेजर संजय तुकाराम गव्हाळे (रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सप्टेंबर महिन्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सातारा शहरातील पाच एटीएममध्ये हा प्रकार घडला आहे. 

एटीएम मशिनमध्ये आलेल्या एररचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केला आहे. एटीएम कार्डचा वापर करत इतरांच्या अकौंटवरून ट्रान्झॅक्शन करून सुमारे २ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बघे तपास करत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या