Satara News : म्हसवड येथे साकारला साडेसहा मेगावॅटचा सौरप्रकल्प


माण तालुक्यातील १२ गावांतील कृषीपंपांना आता मिळणार दिवसा वीज

Satara News :  'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' योजनेतून म्हसवड (ता. माण) येथे साकारलेल्या सौर प्रकल्पातून १२ गावांतील १८०० शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना आता दिवसा वीज मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या १२ गावांतील शेतकऱ्यांना आता पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागणार नाही.  

गांधी जयंतीचे औचित्य साधून ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्यातील ५० कृषीवाहिन्या सौर ऊर्जेवर सुरु करण्याचे निर्देश दिले होते. या ५० मध्ये वडूज विभागातील म्हसवड उपकेंद्रातील देवापूर, धुळदेव व खडकी - भाटकी या तीन वाहिन्यांचा समावेश आहे. हा सौर प्रकल्प महापारेषण कंपनीच्या जागेवर असून, त्याची स्थापित क्षमता ६.५ मेगावॅट इतकी आहे.

सद्यस्थितीत शेतीला दिवसा आठ व रात्री दहा तास असा चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा केला जातो. रात्रीअपरात्री पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा विचार करुन महाराष्ट्र शासनाने शेतीला दिवसा वीज देण्यासाठी 'मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी' ही योजना हाती घेतली आहे.

कोणत्या गावांना केव्हा वीज मिळणार ?

देवापूर वाहिनीवर म्हसवड, देवापूर, पळसावडे, वीरकरवाडी, बनगरवाडी, शिरताव गावातील ६०० कृषीपंप आहेत. त्यांना सकाळी ६ ते दुपारी २ यावेळेत वीजपुरवठा होईल. धुळदेव वाहिनीवरील धुळदेवसह हिंगणी व ढोकमोड गावातील ७०० कृषीपंपांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीज मिळेल. तर खडकी-भाटकी वाहिनीवरील खडकी, भाटकी व मासाळवाडी या गावातील ५०० कृषीपंपांना यापुढे सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत वीजपुरवठा मिळणार आहे. 

हा प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे, बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, सातारचे अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड, वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे यांच्यासह महावितरण व महापारेषणच्या अधिकारी - कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

प्रकल्पासाठी उपकेंद्राजवळ जागा मिळावी

सौर प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रांपासून जवळ शासकीय अथवा खाजगी जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. अशा जागा उपलब्ध करुन देण्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना सहकार्य करण्याचे व त्या भागातील किमान ८० टक्के शेतकऱ्यांना चालू बिले भरण्याचे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या