Satara News : हाथरस घटनेचे वाठार स्टेशनमध्ये संतप्त पडसाद


शिवसेना क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध मोर्चा

Satara News : उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेच्या निषेधार्थ कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथे शिवसेनेचे फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रप्रमुख अमोल आवळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, बहुजन एकता महासंघ, रिपाइं व मित्र पक्षांच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

हाथरससारख्या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. यासारख्या घटना घडल्यानंतर सरकारने शांत न बसता अशी शिक्षा सूनवावी की पुन्हा चुकूनही अशी निंदनीय घटना कोणाकडूनही घडता कामा नये. या घटनेने संपूर्ण देशातील वातावरण खराब झाले आहे. लवकरात लवकर आरोपींना शिक्षा मिळावी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर कायदा करण्यात यावा, असे संतप्त उद्गार अमोल आवळे यांनी आंदोलकांपुढे बोलताना काढले.

या निषेध मोर्चात रिपाइंचे हेमंत दोरके, हमीदभाई पठाण, इरफान पठाण, सुमित चव्हाण, निस्सार मोमीन, दत्ता जाधव, पांडुरंग मोरे, संतोष मोरे, शेखर कांबळे, श्रीकांत चव्हाण, ओमप्रकाश गुप्ता, राजू मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सामील झाले होते.

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या