Satara News : जिल्ह्यात आणखी २२ जणांचा मृत्यू; नवे ३१२ पॉझिटिव्ह

आलेख खालावला असला तरी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता

Satara News : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. रूग्णवाढ आणि मृतांचा आलेख खाली आला असला तरी अद्याप सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. गाफिल राहिल्यास कोरोना आपल्याला गाठू शकतो अशी परिस्थिती आहे. 


जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून कोरोनाने आणखी २२ जणांचा जीव गेला असून मृतांचा आकडा १२७३ पर्यंत गेला आहे. तसेच काल जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार ३१२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

कोरोना बाधित अहवालामध्ये... 

सातारा तालुका : सातारा १३, मंगळवार पेठ ४, बुधवार पेठ १, गुरुवार पेठ ३, शनिवार पेठ २, भवानी पेठ २, रविवार पेठ २, पंताचा गोट २, व्यंकटपुरा पेठ १, मल्हार पेठ १, गेंडामाळ १, करंजे ८, शाहूपुरी ७, शाहूनगर २, सदरबझार १०, गोळीबार मैदान १, गोडोली १०, जुनी एमआयडीसी रोड १, कल्याणीनगर १, तामजाईनगर २, कोडोली ३, राजगुरुनगर १, ठक्कर सिटी १, खेड २, कारंडवाडी १, देगाव १, अतित १, भाटमरळी १, पिरवाडी २, वाढे १, सैदापूर २, कोंढवे ३, बसाप्पाचीवाडी १, पाटखळ २, खिंडवाडी १, देगाव फाटा १.

कराड तालुका : कराड ९, सोमवार पेठ १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठ ३, कोयना वसाहत १, सैदापूर १, बनवडी १, विद्यानगर २, ओगलेवाडी १, मलकापूर ३, आटके २, काले १०, गोळेश्वर ४, वडगाव १, केसे १, इंदोली १, घोणशी १, कुंभारगाव २, कडेगाव १, शेरे २, उंब्रज १, किरपे १, कार्वे नाका १, वनवासमाची १, कालेगाव १,  शेणोली १, रेठरे ३, कोळेवाडी १, साळशिरंबे १, उंडाळे १, नांदलापूर १, आगाशिवनगर १, घोगाव १, नारायणवाडी १, मसूर ३, हणबरवाडी १, हेळगाव १, वाघेश्वर २, यशवंतनगर १, कोपर्डे हवेली १, वाठार १, मुंढे २, कापील १, सुपने १, हजारमाची २, बेघरवस्ती कराड १.

फलटण तालुका : फलटण १, मंगळवार पेठ १, स्वामी विवेकानंदनगर १, कोळकी १, निरगुडी २, ठाकुरकी १, गोखळी १, फडतरवाडी १, धुमाळवाडी २, बोडकेवाडी २, गिरवी १, वडगाव २, पाडेगाव १, धुळदेव १, सुरवडी १, कापडगाव १, झिरपवाडी २.

वाई तालुका : भुर्इंज १, सुरुर १, कवठे १, धोम १, बावधन १.

पाटण तालुका : पाटण २, तारळे ३, कोंजावडे २, माजगाव १, पांढरवाडी १, डेरवन १, गारवडे २, मल्हारपेठ १, मरळी १.

खंडाळा तालुका : खंडाळा २, अंदोरी १, अहिरे १.

महाबळेश्वर तालुका : महाबळेश्वर ९, पाचगणी १, भिलार १.

खटाव तालुका : वडूज २, खटाव १, पुसेगाव २, खातगुण १, बुध २, गणेशवाडी १, वाकेश्वर ४, कुरोली ४, औंध ६, पळशी १, कळंबी १, चोराडे १, गोपुज १, उंबर्डे १, राजापूर १, गोरेगाव वांगी १.

माण तालुका : दहिवडी ३, दिवड १, म्हसवड ३, पाणवन १.

कोरेगाव तालुका : कोरेगाव ३, तारगाव १, वाठार किरोली १, त्रिपुटी १, रेवडी १, पाडळी १, जळगाव २, एकसळ १, रहिमतपूर ५, सांगवी १.

जावली तालुका : कुडाळ १, बामणोली १.

जिल्ह्यात २२ बाधितांचा मृत्यू

सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे पुसेगाव (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, सोनगाव (ता. जावली) येथील ५२ वर्षीय पुरुष, शिवथर (ता. सातारा) येथील ४९ वर्षीय पुरुष, येणके (ता. कराड) येथील ८० वर्षीय पुरुष, कळंबे (ता. सातारा) येथील ६० वर्षीय पुरुष, खराडवाडी (ता. पाटण) येथील ५१ वर्षीय पुरुष, आंबळे (ता. पाटण) येथील ७० वर्षीय पुरुष, देगाव (ता. सातारा) येथील ७० वर्षीय महिला. तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये सिद्धेश्वर कुरोली (ता. खटाव) येथील ८० वर्षीय पुरुष, कोडोली (ता. कराड) येथील ७६ वर्षीय पुरुष, वरकुटे मलवडी (ता. माण) येथील ७७ वर्षीय पुरुष, कराड येथील ६० वर्षीय महिला, अंगापूर वंदन (ता. सातारा) येथील ८३ वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील ७५ वर्षीय पुरुष, राजापूर (ता. खटाव) येथील ७० वर्षीय महिला, धनगरवाडी (ता. सातारा) येथील ९१ वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेल्यांमध्ये जिल्हा रुग्णालय येथे केंजळ (ता. वाई) येथील ५४ वर्षीय महिला, कण्हेरखेड (ता. कोरेगाव) येथील ५५ वर्षीय महिला, गोरेगाव वांगी (ता. खटाव) येथील ६३ वर्षीय पुरुष, वडूज (ता. खटाव) येथील ६९ वर्षीय पुरुष, सोनगाव (ता. कोरेगाव) येथील ६५ वर्षीय पुरुष, वाकुर्डे बुद्रुक (ता. शिराळा, जि. सांगली) येथील ७० वर्षीय पुरुष अशा एकूण २२ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

सातारा जिल्हा कोरोना

  • घेतलेले एकूण नमुने - १५२४३१ 
  • एकूण बाधित - ३९७५७
  • घरी सोडण्यात आलेले - ३०७५३
  • मृत्यू - १२७३
  • उपचारार्थ रुग्ण – ७७३१

Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या