१४ रुग्ण ऑक्सिजन बेडवर, तर ४ रुग्णांवर आयसीयू बेडवर उपचार
सातारा : येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारण्यात आलेले जम्बो कोविड हॉस्पिटल आजपासून सुरु झाले असून पहिल्या दिवशी १८ रुग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये १४ रुग्ण ऑक्सिजन बेडवर, तर ४ रुग्ण आयसीयू बेडवर उपचार घेत आहेत.
जिल्ह्याच्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल असावे अशी सर्वांची इच्छा होती. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक - निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून या जिल्हा कोविड हॉस्पिटलची उभारणी जलदगतीने झाली.
या हॉस्पिटलचे उद्घाटन ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. आज हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेसाठी सुरु झाले आहे.
डायलिसीस असलेल्या रुग्णांसाठीही ४ बेड
या हॉस्पिटलमध्ये २३४ ऑक्सिजन बेड व ५२ आयसीयू बेड आहेत. डायलिसीस असलेल्या रुग्णांना रुग्णालये घेत नाहीत, अशा रुग्णांसाठीही ४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
या जिल्हा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या उपचाराची माहिती जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी या संस्थेत दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत नातेवाईकांना देण्यात येणार आहे. नातेवाईकांसाठी या ठिकाणी तात्पुरते थांबण्याची सोय सुविधा करण्यात आली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या