नियमावली तयार करून आठवडी बाजारास परवानगी देण्याची मागणी
Satara News : ज्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे बाजारावरच अवलंबून असतो, रोजचा प्रपंचाचा गाडा हा बाजारावरच चालतो अशा लहानसहान व्यापार करणाऱ्या खटाव तालुक्यातील व्यापारी वर्गाचा लॉकडाऊनपासून जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
मिठाई, खेळणी, लहान कापड व्यवसायिक यांची कोरोनामुळे फार पंचाईत झाली आहे. अनेक लहान शेतकरीही आपल्या शेतीमध्ये भाजीपाला, फळे पिकवून ते आठवडा बाजारात विकण्यासाठी आणतात. त्यालाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहक मिळेनासे झाले आहेत.
नाईलाजास्तव हा माल होलसेल दरात व्यापाऱ्यांना द्यावा लागत आहे. तिथे तोटा ठरलेला असतो. अनेक लहान व्यापाऱ्यांना रोजगार करण्याची वेळ आली आहे. ग्राहक फिरकायला तयार नसल्याने अनेकांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत.
शासनाने अटी जरूर घालाव्यात, पण आमचा पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा अशी विनवणी तालुक्यातील लहान विक्रेते करीत आहेत.
कर्जे फेडायची तरी कशी ?
आमच्यावर बँकांची कर्जे असून ती फेडायची कशी, प्रपंच चालणार तरी कसे हा लहान व्यापाऱ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ग्रामपंचायत व नगरपंचायत विभागासाठी नियमावली तयार करून आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी द्यावी. शासनाने आमच्या या मागणीचा विचार करावा.
- महेश खडके, वडूज.
Get all live and latest Satara news, Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या