लोकांनी मागच्यासारखीच काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Satara News : कोरोना संसर्ग कमी झाला आहे, याचा अर्थ तो संपला आहे असा नाही. लोकांनी मार्केट, वाहतूक खुली झाली म्हणून कोरोना काळाचे नियम मोडून वागणूक केल्यास पुन्हा तेच दिवस येतील. म्हणून सातारा जिल्ह्यातील जनतेने पूर्वी जी काळजी घेतली तशीच काळजी दिवाळीनिमित्त बाहेर पडताना घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
युरोपमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. सध्या युरोपीय देशांमध्ये रोज कोरोनाचे दीड ते दोन लाख रुग्ण आढळत आहेत. सध्या आपल्या जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी आढळत आहेत. दिवाळी जवळ आली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये गर्दी दिसत आहे.
पण नागरिकांनी गर्दी करु नये, बाहेर पडताना योग्यरित्या मास्कचा वापर करावा, सतत हात धुणे किंवा सॅनिटायझ करावे व मार्केटमध्ये खरेदी करताना सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करु नका
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेमुळे बऱ्याच प्रमाणात कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळत आहेत. ही मोहीम १४ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर व १४ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आली. दीपावली हा महत्वपूर्ण सण असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी करु नये. खरेदी करताना सामाजिक अंतराचे पालन करावे.
घाबरुन न जाता काळजी घेणे सर्वांची जबाबदारी आहे. घराच्या बाहेर पडताना मास्कचा वापर करा, सतत साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा तसेच सामजिक अंतर ठेवा. कोरोना संसर्गावर अजून लस आली नाही, आली तरी ते शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचायला ६ महिने ते १ वर्ष लागू शकते.
सध्या तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या त्रिसुत्री नियमांचा वापर केला पाहिजे. नागरिकांनी स्वत:बरोबर आपल्या परिवाराची आजबाजुच्या लोकांची काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या